पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'

विनोद तावडे

स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्वागत केले आहे. तसंच, संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सर्वात आधी अंदमानातील तुरुंगात पाठवावे लागेल, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी केली आहे. 

'विद्यापीठे ही फक्त वीटा-मातीपासून तयार झालेली नाहीत'

संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते विनोद तावडे यांनी असे सांगितले आहे. 'संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्याला पाठिंबा द्यायलाच हवा. त्यांनी म्हटल्याप्रमाणे सावरकर विरोधकांना जर अंदमानातील तुरुंगात पाठवायचे झाले तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वात आधी पाठवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसंच, संजय राऊत यांनी आधी केलेल्या वक्तव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे वक्तव्य केले आहे का? अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा'

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी  'माझे नाव राहुल सावरकर नाही आहे' असे म्हटले होते. या वक्तव्याचा निषेध करत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी 'जे लोकं वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करत आहेत. त्यांना दोन दिवसांसाठी अंदमानच्या तुरुंगामध्ये पाठवा. तेव्हा त्यांना सावरकर नेमके काय आहेत हे माहिती पडेल.', असे म्हटले आहे.

'सावरकरांचा विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा'