पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अल्पमतातील नाही तर स्थिर सरकार देऊ - सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसेना आणि भाजप पक्षामध्ये सत्ता स्थापनेवरुन वाद सुरु आहे. सत्ता स्थापनेच्या तिढ्यासंदर्भात आणि राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यपालांना भेटायला जाण्यापूर्वी राज्यामध्ये अल्पमतातील नाही तर स्थिर सरकार देऊ. तसंच राज्यात महायुतीचेच सरकार पुन्हा येणार असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडण नाही पण...

राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती व्हावी हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरु आहे. राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जात असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. घटनात्मक तरतुदींबाबत आम्ही आज राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. राज्यपालांशी चर्चा करुन सरकार स्थापनेचा दावा करु, असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

मराठी मालिकेच्या सेटवर मेकअप आर्टिस्टवर लैंगिक अत्याचार

दरम्यान, कोंडी फुटावी आणि चर्चा व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनेला सोडून सत्ता बनवण्याचा आमचा विचार नाही. शिवसेनेसोबत जनादेश आहे. राज्याला स्थिर सरकार द्यावे ही जबाबदारी आपली आहे. जनतेने आपले कर्तव्य पूर्ण केले आता कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. 

विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

तर, मुख्यमंत्री पदाची मागणी करणाऱ्या शिवसेनाला सुधीर मुनगंटीवर यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत असं शिवसेनेनं समजावं. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. तर, भाजप शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या आरोपांवर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. शिवसेनेचा आमदार कधीही फुटत नाही. शिवसेनेचा आमदार विचारांनी प्रभावित आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे मुनगंटीवर यांनी सांगितले आहे.

राम मंदिर निकाल : शांतता राहिल असे पाहा