पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भविष्यात काहीही घडू शकते: सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार (HT Photo by Pratik Chorge)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती तर सदिच्छा भेट होती. पण भविष्यात काहीही घडू शकते, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

सुरेश प्रभू..सुरेश प्रभू..नाही सुनील प्रभू,विधानसभाध्यक्ष गोंधळले

राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीबद्दल प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी असे सांगितले की, राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती तर फक्त सदिच्छा भेट होती. पण भविष्यात काहीही घडू शकते. कालपर्यंत शिवसेना काँग्रेससोबत जाईल असं कोणी म्हटले तर वेड लागलेय का असे लोकं विचारायचे. पण शेवटी शिवसेना-काँग्रेस एकत्र आलेच.' 

नागपूर जिल्हा परिषदेत गडकरी-बावनकुळेंना मोठा धक्का

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंगळवारी भेट झाली. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. तब्बल दीड तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. येत्या २३ जानेवारीला मुंबई मनसेचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांच्या आसनव्यवस्थेची मुनगंटीवारांना काळजी