पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो'

सुधीर मुनगंटीवार

'दिल्लीत भाजपच्या जागा वाढल्या पण अपेक्षित यश मिळाले नाही. अरविंद केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवावरुन सर्वच राजकिय पक्ष भाजपवर टीका करत आहे. यावर माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जर भाजपने केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार उभा केला असता तर आज दिल्लीत वेगळे चित्र असते, असे त्यांनी सांगितले. 

दिल्लीकरांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली: नवाब मलिक

सुधीर मुनगंटीवार पुढे असे सांगितले की, 'दिल्लीत सत्ता स्थापन करण्याइतपत भाजपला यश मिळाले नाही. मात्र ३ जागांवरुन भाजप १८ ते २० जागांवर म्हणजेच ६ पट पुढे गेली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कुठेतरी कमी पडलो असू शकतो, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. दिल्लीमध्ये मतांचे स्पष्ट ध्रुवीकरण झाले असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच, भाजपाला दिल्लीत नाकारले असते तर १८ ते २० जागा आल्याच नसत्या, असे सांगत त्यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांना उत्तर दिले. 

नामुष्कीजनक पराभवानंतर काँग्रेस नेते म्हणाले...

तसंच, 'अनेक राजकीय पक्ष मोदी आणि शहांना विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. सर्व राजकीय पक्ष विरुध्द भाजप असे चित्र दिसून येत आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. मोदींना विरोध करणाऱ्या या सर्व राजकीय पक्षांना विचार राहिला नाही. त्यांचा एकच विचार तो भाजप विरोधी. या एका विचाराच्या आधारे सर्व पक्ष एकत्र येत आहेत. भाजपला विरोध करण्यामध्ये पक्षाचा खरा विजय आणि पराक्रम असल्याचे ते मानत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. 

काँग्रेसचा सुपडा साफ, दिग्विजय सिंह यांनी आळवला EVMचा मुद्दा

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूकीत जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या निवडणुकीत आप सर्वाधिक म्हणजे ५८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप १२ जागांवर आघाडीवर आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे या निवडणुकीत आपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र दिसून येत आहे. 

दिल्ली भाजपच्या कार्यालयात लागले सूचक संदेश असलेले पोस्टर