पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमच्या व्यथा पक्षासमोर मांडल्या, अहवालानंतर निर्णय होईल-राम शिंदे

राम शिंदे, राधाकृष्ण आणि सुजय विखे-पाटील

आमच्या व्यथा आणि अनुभव आम्ही पक्षाकडे मांडल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी आता वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर पत्र नेतृत्व कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी माध्यमांना दिली. विखे-पाटील पिता-पूत्रांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी तक्रार केली होती. त्याबाबत पक्षाने शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिल्ली निवडणूकः राजीव सातव यांच्यावर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकण्यासाठी ही पहिलीच बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे नेते विजय पुराणिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत. 

'होय, हिंदू असल्यामुळेच मला पाक संघात भेदभाव सहन करावा लागला'

पक्षाने आम्हा सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. याची गांभीर्याने दखल घेतली गेली आहे. पहिल्यांदाच विखे-पाटील आणि आम्ही समोर आलो होतो. प्रदेश कार्यकारिणीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. विधानसभा निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली. पक्षाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत. 

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, रेल्वे तिकीटाचे दर वाढण्याचे संकेत..

निर्णय घेण्यासाठी जे काही आवश्यक बदल करायचे आहेत, ते पक्षाकडून केले जातील. आम्ही मांडलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेले उत्तर यावर जो काही निर्णय घ्यायचा ते घेतील. स्वतंत्र व्यवस्थेद्वारे चौकशी होऊन कारवाई केली जाईल, असेही शिंदे म्हणाले.

टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीची राहत्या घरात आत्महत्या