पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नाईटलाईफ भारतीय संस्कृती नाही, यामुळे निर्भयासारख्या घटना वाढतील'

राज पुरोहित

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचा भाजपने जोरदार निषेध केला आहे. 'नाईटलाईफ ही भारतीय संस्कृती नाही. यामुळे निर्भया सारख्या हजारो घटना वाढतील, असे भाजपचे नेते राज पुरोहित यांनी सांगितले.

प्रियांका गांधींच्या सक्रीय राजकारणाचे एक वर्ष आणि सहा मुद्दे

नाईट लाईफमुळे महिलांवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढतील. नाईट लाईफ म्हणजे रात्रभर नाचणे हे भारतीय संस्कृतीत नाही. तसंच, भारतीय संस्कृती, तरुण पिढी आणि महिलांसाठी नाईट लाईफ योग्यच नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ज्या ठिकाणी बार असेल त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांचे काय होईल, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे कायदा व्यवस्था बिघडेल, असे मत त्यांनी मांडले आहे. 

धक्कादायक! मुंबईत प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार

राज पुरोहित यांनी पुढे असे सांगितले की, मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. मात्र मुंबईत मद्य संस्कृती लोकप्रिय झाल्यास महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. नाईट लाईफमुळे निर्भया सारख्या हजारो घटना घडतील. तसंच, भारतीय संस्कृतीसाठी नाईट लाईफ ही संस्कृती योग्य आहे की नाही याचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

... हे आहेत प्रजासत्ताक दिन संचलनासाठी यंदाचे प्रमुख पाहुणे