पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास, बंडखोरी माझ्या रक्तात नाही'

पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुवर केलेली पोस्ट आणि फेसबुक पेजवरुन भाजपचे नाव, चिन्ह गायब झाल्यामुळे ते नाराज असून पक्षांतराच्या तयारी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आला. भाजप सोडण्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती असून बंडखोरी माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवरुन गायब झालेले कमळ उमलले

फेसबुकवर केलेली पोस्ट दबावतंत्रासाठी केली नव्हती, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. मला आत्मचिंतनासाठी आणि माझ्या लोकांशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तसंच मला कोणतेही पद मिळू नये यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर गायब झालेले कमळ पुन्हा उमलले आहे. मात्र त्यांच्या फेसबुक पेजवर भाजपचे नाव अद्याप नाही. 

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

दरम्यान, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनंतर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. विनोद तावडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या नेत्यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांच्या फेसबुकवर कमळ आल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगितले जात आहे. 

Video : अप्रतिम त्रिफळा उडवला, पण वहाबचाच 'बकरा' झाला