पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवरुन गायब झालेले कमळ उमलले

पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवरुन गायब झालेले कमळ पुन्हा उमलले आहे. पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवरील भाजपचे नाव आणि कमळाचे चिन्ह गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यात पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

पकंजा मुंडे या भाजप सोडण्याच्या तयारीत असलेल्या चर्चानंतर अचानक पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर कमळाचे चिन्ह उमलले आहे. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. मात्र त्यांच्या फेसबुक पेजवर कमळ असले तरी भाजपच्या नावाचा अद्याप उल्लेख करण्यात आलेला नाही. 
यामुळे कॅगने केले केजरीवाल सरकारचे कौतुक

दरम्यान, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनंतर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. विनोद तावडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या नेत्यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांच्या फेसबुकवर कमळ आल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगितले जात आहे. 

पुणे पालिकेच्या सभागृह नेतेपदी धीरज घाटे, स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे