पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर जीभ जागेवर राहणार नाही; नारायण राणेंचा इशारा

नारायण राणे

शिवरायांचे वशंज असल्याचे पुरावे मागणाऱ्या आणि इंदिरा गांधींसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे नेते नारायण राणे यांनी खडसून टीका केली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. संजय राऊत यांना सत्तेचा माज चढला आहे. त्यांच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून ते अशी वक्तव्य करत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसंच, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. आमच्या देवतांच्या खानदान, वंशजांबद्दल काही वेडेवाकडे बोलाल तर जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

 

बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित, अमित शहांची घोषण

इंदिरा गांधींविषयी केलेले वक्तव्य संजय राऊत यांनी मागे घेतले यावर सुध्दा नारायण राणे यांनी टीका केली आहे. वक्तव्य मागे घेऊन काही होणार नाही. जे बोलले ते लोकं विसरणार नाही. संजय राऊत यांचा इंदिरा गांधींबद्दलचा हा आदर म्हणावा की द्वेष म्हणावा?, असा सवाल त्यांनी केला आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस गप्प आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या प्रमुखांनी त्वरीत निर्णय घेणे गरजेचे होते. सत्ता, पैसा यापुढे इंदिरा गांधी काहीच नाही ठरल्या, त्या इतिहास जमा झाल्या आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.    

शिवसैनिकांच्या मनात इदिराजींबद्दल आदराची भावना: आदित्य ठाकरे

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना उद्धव ठाकरे जाब का विचारत नाही. यावर उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत प्रतिक्रिया का नाही दिली, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. याचा अर्थ संजय राऊतांच्या मताशी उद्धव ठाकरे सहमत आहेत, असा याचा अर्थ होतो, असे त्यांनी सांगितले. तसंच, उद्धव ठाकरेंच्या तोंडातून येणारे शब्द संजय राऊतांच्या तोंडातून बाहेर फेकले जातात का? असाही संशय येऊ शकतो, असे देखील त्यांनी सांगितले. 

२४ तासांत वाडिया रुग्णालयाला निधी उपलब्ध करुन द्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp leader narayan rane warn to sanjay raut statment of indira gandhi and chatrapati shivaji maharaj