पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक : राम शिंदेच्या याचिकेवरून हायकोर्टाची रोहित पवार यांना नोटीस

मुंबई उच्च न्यायालय

कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित राजेंद्र पवार यांची विधानसभेत झालेल्या निवडीवर भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आक्षेप घेतला असून, या प्रकरणात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रोहित पवार यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे वाटले आणि आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला. राम शिंदे या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. सलग दोन वेळा राम शिंदे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजयी झाले होते. महाराष्ट्रात गेल्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही राहिले होते.

राज्यसभा निवडणूक : सातव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच?

मतदारांची दिशाभूल करण्याचे काम रोहित पवार यांनी निवडणुकीवेळी केली. हे निवडणूक नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांची या मतदारसंघातून निवड रद्द ठरविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.

मंगळवारी या प्रकरणी न्या. एस एम गव्हाणे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. राम शिंदे यांच्या वतीने वरिष्ठ वकील एस बी तळेकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयात युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले की, रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघात नवखे होते. पण त्यांनी बेकायदा मार्गांचा वापर करून निवडणूक जिंकली. निवडणुकीवेळी रोहित पवार यांनी मतदारांना पैसे वाटले आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून राम शिंदे यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला, असा आरोप याचिकेत करण्यात आला.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवरून कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

रोहित पवार हे बारामती ऍग्रो लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक आहेत. या संस्थेत १७६ कर्मचारी आहेत. या सर्वांची निवडणुकीवेळी मतदारांना पैसे वाटण्यासाठी मदत घेण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी मतदारसंघातील प्रत्येक कुटूंबात प्रत्येक मतासाठी १००० रुपये दिले, असा आरोप करण्यात आला आहे. यासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा राम शिंदे यांच्या याचिकेत करण्यात आला आहे.