पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षातील लोकांमुळेच'

भाजप नेते एकनाथ खडसे

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असून ते वारंवार आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. नाराज असलेले खडसेंचे भाजपवर हल्ले सुरुच आहेत. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला, असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. तसंच, भाजपमध्ये बहुजन समाजाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.

VIDEO: अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका

दरम्यान, भाजपमधील नाराज झालेल्या नेत्यांचा भेटीगाठी वाढल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी बुधवारी पकंजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारणावर टीका केली. 'पक्ष दोषी नसतो तर नेतृत्व करणाऱ्याचे चुकते. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले असे सांगत भाजपामध्ये बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

हिवाळ्यात पावसाळा; मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

भाजपचे नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. हे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. एकनाथ खडसे यांनी बुधवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्याआधी खडसे आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. 

VIDEO: घातपाताचा कट उधळला; १५ किलो स्फोटकं निकामी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp leader eknath khadse says pankaja munde and rohini khadse lost because of party people