पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अधिवेशन नियमांना धरुन होत नाही: फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ संविधानाला धरुन नाही. तसंच आजचे अधिवेशन सुध्दा नियमांना धरुन होत नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि अधिवेशन नियमांवर बोट ठेवले आहे. तसंच, हंगामी अध्यक्ष बदलण्यावर देखील भाजपने आक्षेप घेतला आहे.

सर्व नियम आणि कामकाज धाब्यावर बसवून अधिवेशन होत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच, २७ नोव्हेंबरला झालेले अधिवेशन नियमबाह्य आहे. हे सांगत असताना फडणवीस यांनी कार्यक्रम पत्रिका वाचून दाखवली. २७ नोव्हेंबरचे अधिवेशन राष्ट्रगीतामुळे संस्थगित झाले होते, असे फडणवीस यांनी सांगितले. सभागृह संपते तेव्हा आपण राष्ट्रगीत घेतो. तसंच पुन्हा अधिवेशन बोलवायचे असेल तर राज्यपालांचा समन्स काढावा लागतो, असे त्यांनी सांगितले.

तसंच, नवीन अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमने का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे आक्षेप हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फेटाळून लावले. राज्यपालांनी संध्याकाळी रितसर अधिवेशन बोलवण्यास परवानगी दिली.  राज्यपालांनी सर्व गोष्टींना परवानगी दिल्याने हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे, असे सांगत अध्यक्षांनी फडणवीसांचे मुद्दे फेटाळून लावले. दरम्यान, भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केल्या त्यानंतर त्यांनी सभात्याग केला.