पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प एकांगी आणि जनतेची दिशाभूल करणारा'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

'ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प दिशाभूल करणार आहे. तसंच हा अर्थसंकल्प विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय करणारा आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांवर आज विधानसभेमध्ये उत्तर दिले. यावेळी अजित पवारांनी अर्थसंकल्पावर समाधानकारक उत्तर दिले नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

 

राज्यात कोरोनाच्या १४ रुग्णांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक: आरोग्यमंत्री

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, 'अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भाला काहीही दिले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर दिशाभूल करणारे आहे. सिंचनाबद्दल उपमुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. तसंच, हा एकांगी आणि जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. केवळ राजकीय भाषण, राजकीय टोलेबाजी शिवाय उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.  

मी लपून-छपून काही करत नाही - अजित पवार

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भाला अर्थसंकल्पात काहीच दिले नाही असा आरोप करणाऱ्या विरोधकांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. विदर्भच नाही तर कारवार, निपाणीसारख्या भागांचा देखील विचार आम्ही केला आहे. यासाठी उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहण्याची गरज आहे. एवढेच नाही तर राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी 'उघडा डोळे, बघा नीट' असा सल्ला अजित पवारांनी विरोधकांना दिला आहे. 

हत्येप्रकरणी कुलदीपसिंह सेनगरला १० वर्षांची शिक्षा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp leader devendra fadnavis says thackeray government budget one sided and misleading the public