पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायचे का?; फडणवीसांचा सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कुख्यात गुंड करीम लाला यांच्या भेटीविषयी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस गप्प का आहे? असा सवाल केला आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी संजय राऊत यांच्या या आरोपावर उत्तर दिले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले.

संजय राऊतांकडून इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे

फडणवीस यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'काँग्रेस पक्षाचे नवी सहयोगी. ज्यांच्यासोबत काँग्रेसने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. त्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेला खुलासा धक्कादायक आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गाँधी मुंबईतील पायधुणीमध्ये करीम लाला याला भेटायला येत होत्या. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत', असे फडणवीस यांनी सांगितले आहे. 

इंडिगोच्या पुणे-जयपूर विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी-करीम लाला भेटीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, 'इंदिराजींसारख्या सर्वोच्च नेत्यावर आरोपानंतर काँग्रेस गप्प का?, निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायची का?, पोलिस आयुक्त अंडरवर्ल्डच्या संमतीने ठरवित होता काय?, मुंबईत स्फोट घडविणार्‍यांशी काँग्रेसचा काय संबंध?, सोनिया गांधीजी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या प्रश्नांची उत्तरं द्या अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 

घड्याळवाले आता आमचे पार्टनर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp leader devendra fadnavis says senior leaders of congress must answer the people association with criminals