पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येणार: फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Kunal Patil/HT Photo)

राज्यामध्ये भाजपशिवाय दुसरे कुणाचेही सरकार येऊ शकत नाही, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यात भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार आहे. राज्यात सध्या अशीच परिस्थिती आहे, असे फणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकी दरम्यान सांगितले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी भाजपने कंबर खचली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री भाजपच्या कार्यकारणीची दादर येथील भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकी दरम्यान फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. 

क्रिकेट अन् राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते : गडकरी

या बैठकी दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि भाजपला पाठिंबा दिलेले आमदार उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याचे सांगितले. तसंच सत्ता स्थापनेवेळी मुंबईत बोलवू तोपर्यंत जनतेमध्ये जाऊन त्यांना राज्यात पुन्हा आपलेच सरकार येणार असल्याचा विश्वास द्या असे त्यांनी सर्व आमदारांना सांगितले. तसंच, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्यावा, त्यांना मदत करा, असे आदेश त्यांनी दिले. 

सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आमचे लक्ष: भाजप

दरम्यान, आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लगावला आहे. या बैठकी दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील आमदारांना मार्गदर्शन केले. 

एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा तयार, पक्षश्रेष्ठी घेणार अंतिम निर्णय