पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दालनं, पालकमंत्र्यांची भांडणं संपली की सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

राज्यामध्ये नव्याने आलेल्या ठाकरे सरकारमध्ये सुरु असलेल्या वादावर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नव्या सरकारमधील नेत्यांमध्ये सुरु असलेले वाद जेव्हा संपतील तेव्हा ते शेतकऱ्यांकडे लक्ष देतील, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. 

होय शरद पवार जाणता राजा आहेत; जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत एका भाषणाचा व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'आता नविन सरकार आले आहे. नविन सरकारला अजूनपर्यंत शेतकरी, शेती, कारखानदारी, सहकार, फळबागा याच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. 

सुशिक्षितांनाही शिकवावे लागते याचे हे योग्य उदाहरण, लेखींचे उत्तर

दरम्यान, वेळ कधी मिळेल. जर भांडणं संपली तर वेळ मिळेल. आता घरात जी भांडणं असतील, दालनांची भांडणं असतील, पालकमंत्र्याची भांडणं असतील. ही भांडणं पुढच्या ६- ८ महिन्यात संपली तर ते कदाचित शेतकऱ्यांकडे वळून पाहू शकतील. तो पर्यंत पाहतील अशा प्रकराची अपेक्षा करणे मला योग्य वाटत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

दुसऱ्या महायुद्धातील २५० किलोचे जिवंत बॉम्ब सापडले