पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सरकारने सरसकट कर्जमाफी नाही तर सरसकट धोकेबाजी केली'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीवर विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर सरसकट धोकेबाजी केली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

'बाळासाहेब ठाकरेंना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो'

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करु असे सरकारने सांगितले. सरकारने कर्जमाफीसंदर्भात काढलेला जीआर अटी-शर्थी लागू करणारा आहे. या जीआरमध्ये २०१५ ते सप्टेंबर २०१९च्या मधलेच कर्ज पाहिजे, त्याच काळात ते कर्ज थकबाकीत गेले पाहिजे, पीक कर्जच पाहिजे, मुदत कर्ज चालणार नाही, अल्पमुदत कर्ज चालणार नाही अशाप्रकारच्या अनेक अटी सरकारने टाकल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा काहीच फायदा होणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. तसंच ही सरसकट कर्जमाफी नाही तर सरसकट धोकेबाजी आहे अशी टीका त्यांनी केली आहे.  

नवा वाद! उच्च शिक्षण मंत्री सामंतही ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी

तसंच, राज्यामध्ये ऑक्टोबर २०१९ च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ६० ते ७० लाख शेतकरी अवकाळी पावसामुळे कर्जबाजारी झाले आहेत. सरकारने कर्जमाफीमध्ये चालाखी करत सांगितले की ज्याचे कर्ज सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असेल त्यालाच सरसकट कर्जमाफी मिळेल. म्हणजे ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. 

भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायी सुरक्षित; ट्विंटकलची खोचक टिप्पणी