भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलण्याबाबत अफवा पसरवल्या जात असून या अफवा थांबवाव्यात, असे आवाहन भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या कालही होत्या, आजही आहे आणि उद्याही असतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एक नवा पैसाही परत पाठवला नाही, फडणवीसांनी हेगडेंचा दावा फेटाळला
गेल्या दोन दिवसांपासून पंकजा मुंडे भाजप व्यतिरिक्त अन्य काही विचार करतील अशा चर्चा सुरु आहेत. अपघाताने आलेल्या सरकारनंतर अशा प्रकारच्या अफवा सुरु आहेत. अशा प्रकारच्या अफवांना काही तथ्य नाही. पंकजा मुंडेंशी आमचे बोलणे झाले आहे. त्या ज्या स्थरावरुन मंत्री पदापर्यंत आल्या आहेत. त्यामुळे त्या अशाप्रकराचा विचार करणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
'पंकजा मुंडे काय अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात'
दरम्यान, कोणताही मोठा नेता ज्यावेळी हारतो तेव्हा तो दु:खी होतो. आत्मचिंतन सुध्दा करतो. ते आत्मचिंतन नविन मार्ग शोधण्यासाठी होत नाही. त्यामुळे या प्रकारच्या आफवांना काहीच तथ्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, १२ डिसेंबर रोजी स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवस कार्याक्रमाला आम्ही सर्वजण जाणार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले.