पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'छत्रपतींच्या घराण्याविषयी एकही अपशब्द कदापी खपवून घेणार नाही'

चंद्रकांत पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले असून निषेध केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक परिपत्रक काढत छत्रपतींच्या घराण्यासंदर्भात एकही अपशब्द महाराष्ट्र कदापी खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

वंशज असल्याचे पुरावे आणा, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापले

सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना खडसावून सांगितले आहे. तसंच, उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्यांच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या मस्तवाल विधानाचा आम्ही निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा अपमान भाजप आणि शिवप्रेमी कधीच सहन करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. 

'छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या सर्व पुस्तकांवर

शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे  हेच संजय राऊत यांच्या विधानावरुन दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

'जाणता राजा'च्या उपाधीवरुन शरद पवारांनी साताऱ्यात केलं हे भाष्य

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp leader chandrakant patil reaction sanjay raut statement on descendant of shivaji maharaj