पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही: चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील (ANI)

'राज्यातील शेतकऱ्यांना फसवले जात आहे. महिला असुक्षित आहेत. शेतकरी आणि महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.', असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. शेतकरी फसवणूक आणि महिला अत्याचाराविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे धरणे आंदोलन सुरु आहे. 

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच, गोंधळात विधेयक मंजूर

'हे सरकार घाणेरडे आहे. सरकारला भितीच्या वातावरणात ठेवले नाही तर ते न्याय मिळवून देणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. तर, उद्धव ठाकरे यांनी फक्त शरद पवारांचे ऐकू नये असा सल्ला त्यांनी दिला. तसंच, सरकारविरोधात राज्यभर ४०० ठिकाणी धरणे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

...तर कर्जमाफी द्यायला ४०० महिने लागतील: फडणवीस