पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'...हा भाजप आणि संघ परिवाराच्या बदनामीचा कट'

आशिष शेलार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी भाजपचा काहीही संबंध नाही. हा भाजप आणि संघ परिवाला बदनामीचा कट आहे, अशी माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रकार वाढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना या जगात कोणाशीही होऊ शकत नाही, असे आशिष शेलार यांनी सांगितले. 

मुंबईतील 'नाईट लाईफ'ला मंत्रिमंडळाची मंजुरी, अशी होणार अंमलबजावणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी यांचा विपर्यास करुन सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. हा भाजप आणि संघ परिवाला बदनामीचा कट आहे. विचारधारेच्या युध्दात जमिनीवर लोकसमर्थनार्थ जे आम्हाला  पराभूत करत नाहीत. ते आभासी दहशतवाद निर्माण करतात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. खोट्या बातम्या निर्माण करुन आम्हाला बदनाम करण्याचे काम सध्या सुरु आहे, असे देखील त्यांनी सांगितले. 

नाईट लाईफ नसून ही किलिंग नाईट; आशिष शेलारांचे टीकास्त्र

दरम्यान, भाजपला बदनाम करण्यासाठी अपप्रचार सुरु आहे. सामान्य लोकांच्या विवेकबुध्दीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जनतेने भाजपला समर्थन दिले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, आभासी दहशतवाद निर्माण करणारे पराभूत होतील, असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ट्विटर हँडलवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची तुलना अनुक्रमे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करणारा वादग्रस्त व्हिडिओ टाकण्यात आला होता. 

'हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम हेच तर काँग्रेस करत आलाय'