पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार

आशिष शेलार

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झाले. या विधेयकाला लोकसभेमध्ये शिवसेनेने पाठिंबा दिला मात्र राज्यसभेमध्ये मतदान सुरु असताना शिवसेनेने सभात्याग केला. यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, 'रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!', असे ट्विट करत आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

संसदेच्या मान्यतेनंतर आता नागरिकत्व विधेयकापुढे हे आव्हान

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,' देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको? अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

GDP घटण्याची चिंता नाही, प्रणव मुखर्जींचे महत्त्वपूर्ण विधान

दरम्यान, आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले. जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपमुळेच झाले आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच, या विधेयकाला काहींचा विरोध होता. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले. काहीजण "जनपथला" घाबरुन सभागृहातून पळाले..?आणि फसले!, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. 

हैदराबाद एन्काऊंटर: माजी न्यायाधीशामार्फत चौकशी होण्याची शक्यता