पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजप नेते नरेंद्र मेहता

भाजपचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेविकेने नरेंद्र मेहतांविरोधात अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी या नगरसेविकेने कोकण महानिरिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती.

गुप्तचर अधिकाऱ्याची हत्या चाकूने भोकसून; शवविच्छेदन अहवालात खुलासा

मीरा-भाईंदर पोलिस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री उशिरा नरेंद्र मेहता यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे नरेंद्र मेहता यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नरेंद्र मेहता सध्या फरार आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला होता. तर दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मेहतांचा एक अश्लिल व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

कोरोनाचा कहर, शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ११०७ अंकानी कोसळला

भाजप नगरसेविकेने केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, 'नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या कुटुंबियाला धोका आहे. नरेंद्र मेहतांनी १९९९ पासून ते २०२० पर्यंत माझे लैंगिक शोषण केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझा वापर करून घेतला होता. माझ्याप्रमाणेच मेहता यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे.' दरम्यान, भाजपच्या नगरसेविकेने याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली. 

हिंसाचारानंतर एका भागातूनच गोळा केले २ हजार किलो विटांचे तुकडे