पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नाईट लाईफ'मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण- आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार

'नाईट लाईफ'मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात येईल तसेच पोलिसांवर ताण येईल असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी हॉटेल्स, बार, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णयास विरोध केला आहे. मुंबईत २७ जानेवारीपासून  प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक पार पडली या बैठकीत प्रायोगिक  तत्त्वावर २४ तास हॉटेल्स, बार, पब  सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत नाईटलाईफ असावी ही संकल्पना सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच ही संकल्पना त्यांनी मांडली होती. 

ट्रम्प फेब्रुवारीत भारतात, गुजरातमध्ये 'हाऊडी मोदी'सारखा कार्यक्रम

'व्यापार वाढीसाठी 24×7 माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे पण त्याच गोंडस नावने रात्रभर बार, लेडिजबार, पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण येईल. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच आहे' असं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे. 

मी बेळगावला येतोय, पाहू काय घडतंयः संजय राऊत

'मुंबईत हाँटेल, बार, पब 24×7 सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं समजत आहे, त्याबाबत नियमावली जाहीर झाली की आम्ही सविस्तर बोलूच मात्र  निवासी भागात हाँटेल, पब 24×7  सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा या संकल्पनेस कडाडून विरोध राहिल' असंही शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.