पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बविआचे बोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत

बविआचे बोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील 'इनकमिंग' जोरात सुरु आहे. विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा प्रभाव राहिल या आशेने अनेक मातब्बर नेते, आजी-माजी आमदार भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहे. पण हे इनकमिंग युतीचे जागावाटप पाहून होत असल्याचे दिसते. पक्षप्रवेशाच्या याच मालिकेत आता बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून तरे यांचा पक्षप्रवेश केला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

विलास तरे हे सलग दोन वेळा विरारचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. तरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना पालघर लोकसभा मतदारसंघातील आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत असल्याचे दिसून येते. बविआची वसई-विरार या पट्ट्यात मक्तेदारी झाली आहे.