पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टला पुन्हा संपावर जाणार

मुंबईतील बेस्ट सेवा

बेस्ट कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. येत्या ६ ऑगस्टला मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये झालेल्या सामंजस्य करारामधील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवाशर्तीबाबत तातडीने वाटाघाटी सुरु कराव्यात या प्रमुख मागणीसाठी बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. दरम्यान, या संपाची पूर्ण जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची असेल असे देखील शशांक राव यांनी सांगितले आहे. 

स्टेट बँकेची ही सेवा १ ऑगस्टपासून मोफत

दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्यातील संपानंतर ११ जून रोजी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि बेस्ट उपक्रमाची अर्थिक जबाबदारी महापलिकेने स्वीकारण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. महापालिका आयुक्तांच्या  पुढाकाराने बेस्ट उपक्रम आणि बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये एक सामंजस्य करारावर सह्या केल्या होत्या. त्यानुसार एप्रिल २०१७ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना उर्वरित १० वेतनवाढी मंजुर करुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली होती. सामंजस्य करारात कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसंदर्भात तातडीने वाटाघाटी सुरु करण्यात येतील असे देखील त्यामुळे नमुद करण्यात आले होते. 

९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये रंगणार

बेस्ट प्रशासनाला चर्चा करण्यासाठी ८ जुलै रोजी युनियनने पत्र पाठविण्यात आले होते. याबाबत त्यांना अनेकदा आठवण देखील करुन देण्यात आली होती. मात्र बेस्ट प्रशासनाने काहीच उत्तर दिले नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने तातडीने निर्णय दिला नाही तर ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर कधीही बेस्ट कर्मचारी संपावर जातील अशी माहीती युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली.

युवा राहुल चहरच्या यशातही धोनीचा हात

दरम्यान, याआधी देखील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टकर्मचारी संपावर गेले होते. तो संप ९ दिवस सुरु होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने २००७ पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १० वेतनवाढी १ जानेवारी २०१९ पासून तातडीने देण्यास सांगितले होते.

'या' खेळाडूत धोनीची जागा घेणाऱ्या पंतला टक्कर देण्याची क्षमता