पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात १२ हजारांची वाढ; सर्व आगारामध्ये जल्लोष

बेस्ट कर्मचारी

गेल्या अनेक वर्षांपासून पगार वाढीसाठी लढा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर यश आले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये १२ हजारांची वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेत गुरुवारी वेतन करार झाला. यावेळी हा निर्णय झाला असून या वेतन करारानुसार कामगारांना १७ टक्के वेतनवाढ मिळणार आहे. 

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार

पगार वाढ होणार असल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबईतील सर्व आगारामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवत जल्लोष केला आणि पेढे वाटण्यात आले. बेस्टच्या जवळपास ३७ हजार कर्मचाऱ्यांना या पगारवाढीचा फायदा होणार आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत हा करार करण्यात आला होता. या वेतन करारासाठी ११५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. 

निवडणूक तयारीला वेग, प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह इतर मागण्यासाठी बेस्ट कामगार कृती समितीने अनेकदा आंदोलन केली आहेत. या मागणीसाठी बेस्ट कामगार कृती समितीचे प्रमुख शशांक राव मंगळवारपासून उपोषणाला बसले होते. मात्र उपोषणा दरम्यान प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

रशिया दौऱ्यातील मोदींच्या 'या' व्हायरल व्हिडीओचे होतेय कौतुक