पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: माटुंग्यातील महेश्वरी उद्यानाजवळ बेस्टच्या बसला भीषण आग

बेस्टच्या बसला आग

मुंबईमध्ये बेस्टच्या बसला आग लागण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास माटुंगा येथे बेस्टच्या बसला भीषण आग लागली. किंग सर्कल येथील महेश्वरी उद्यानाजवळ ही घटना घडली आहे. बसला आग लागल्याची माहती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू 15 जण गंभीर 

मुलुंडवरुन वरळीच्या दिशेने जाणाऱ्या 27 क्रमांकाच्या बसला अचानक आग लागली. चालकाच्या केबिनमधील इलेक्ट्रिक बोर्डात शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीमध्ये बसचे आसन आणि बसचा पुढचा भाग जळून खाक झाला आहे. आग लागल्याचे कळताच बसमधील चालक आणि वाहकासह सर्व प्रवासी खाली उतरले. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. 

पुलवामा हल्ल्याच्या आणखी एका सूत्रधाराचा खात्मा