पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्र्यातही 'लंडन आय', 'मुंबई आय'मधून घडणार 'मुंबापुरी'चे दर्शन

लंडन आय

लंडनमधील सर्वात प्रसिद्ध अशा 'लंडन आय'च्या धर्तीवर मुंबईतही 'मुंबई आय' उभारण्यात येणार आहे. त्यामुळे देशातल्या सर्वांत मोठ्या पाळण्यामधून 'मुंबापुरी'चे विहंगम दृश्य  घडणार आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर ही माहिती दिली. वांद्रे रिक्लमेशन परिसरात यासाठी जागा उपलब्ध आहे, ही जागा नियमांत बसत असेल तर  त्याठिकाणी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करेल असा 'मुंबई आय' उभारण्यात येईल अशी माहिती  पवार  यांनी दिली. 

महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याच्या खर्चाचा आकडा आला समोर

चार वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचा वांद्रे बॅण्ड स्टॅण्डजवळील १४ हजार स्वेअर मीटर जागेवर 'मुंबई आय' उभारण्याचा प्रस्ताव होता. महापालिकेच्या प्रस्तावानुसार या 'मुंबई आय'ची उंची ६३० मीटर इतकी असणार होती. मात्र पुरेशा निधीअभावी हा प्रस्ताव तिथेच थांबला. लंडनव्यतीरिक्त सिंगापूर, चीन, लास वेगास इथे  जगातील उंच आकाशपाळणे आहेत. या पाळण्यात बसून शहाराचं विहंगम दृश्य  पाहण्यात लाखो पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनं 'मुंबई आय' महत्त्वाचा ठरणार आहे. 

राज्यातही होणार 'तान्हाजी' करमुक्त, लवकरच घोषणा

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळील जागेत मुंबई आय  उभारण्याचे विचाराधीन आहे. सीआरझेड व इतर परवानग्यांबाबत अडचण निर्माण न झाल्यास याच ठिकाणी 'मुंबई आय' साकारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.