विधानसभेत विरोधी पक्षच दिसत नसल्याचं विधान करणाऱ्यांवर आज विरोधात बसायची वेळ आली असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी शिवतिर्थावर जाऊन शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच, आजचा शपथविधी सोहळा म्हणजे, नव्या युगाचा प्रारंभ. महाविकासआघाडीचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आणि जनतेची कामंही करणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
'कितीही चौकशा करा आम्हाला काहीही फरक पडणार नाही'
तसंच, आज किती मंत्री शपथ घेणार आहेत याबाबत मला माहिती नाही. पण मुख्यमंत्र्यांसह तिन्ही पक्षांचे काही मंत्री शपथ घेतील असे त्यांनी यावेळी सांगितले. तसंच, बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे चांगले संबंध होते. त्यांचा इंदिरा गांधींना पाठिंबा होता, असे देखील त्यांनी सांगितले. तसंच, उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणताही संभ्रम नाही. तिन्ही पक्ष मिळून काम करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
... म्हणून मोदी परदेश दौऱ्यांवेळी हॉटेलमध्ये उतरणे टाळतात
राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार आहे. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजीपार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शपथविधीसाठी मुंबईतले हे रस्ते बंद, या पर्यायी मार्गाचा करा वापर