पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढील काही महिने वायफळ खर्च टाळा, काटकसर कराः शरद पवार

शरद पवार

कोरोना विषाणूचे मोठे संकट राज्यावर आणि देशावर आले आहे. यासाठी राज्य सरकार अहोरात्र झटत आहे. केंद्र सरकारही मेहनत घेत आहे. घराबाहेर येऊ नका. घरात बसून राहा. मीही घरात बसून वाचन करत आहे. टीव्ही पाहत आहे. अद्यापही काहीजण रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा सर्वांशी संवाद साधला. आज देशासमोर मोठे आर्थिक संकट आले आहे. उद्योग-धंदे बंद असल्याने अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे येत्या काळात वायफळ खर्च करु नका. काटकसरीची सवय लावून घ्या असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला आहे. 

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...

यावेळी त्यांनी डॉक्टर, पोलिस, प्रशासन आदींचे आभार मानले. तसेच खासगी डॉक्टरांनी संकट काळात दवाखाने बंद ठेवणे गंभीर बाब असल्याचे म्हटले. वैद्यकीय सेवा देण्याचे काम थांबवू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

राज्य सरकारची भूमिका समंजसपणाची आहे. याचा अर्थ दुबळेपणा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या चुकीचा परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागेल. त्यामुळे प्रत्येकाने अवश्य ती काळजी घ्यावी. 

कोरोनाविरोधातील लढाईसाठी महाराष्ट्राला 'विरुष्का'ची मदत

कोरोनावर आपण विजय मिळवणार आहोत यात शंका नाही. पण सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आरोग्य शिबिरे घेण्यासाठी तयारी करावी लागेल. साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांची सोय कारखान्यावर करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. त्याचबरोबर राज्याला पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

लवकरच पाच मिनिटांत कोरोनाचा अहवाल देणारे टेस्ट किट, १०० रुपयांत चाचणी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:avoid unwanted expenses save money ncp chief sharad pawar advice on the background of Coronavirus covid 19