पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोलिस ठाण्यातच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबईमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस ठाण्यातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या चेंबर पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. संपत गावढे (५८ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. संपत गावढे यांनी पोलिस ठाण्यातील स्टोअर रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. 

मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी; ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

संतप गावढे चेंबूरच्या बसत पार्क पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सोमवारी दुपारी चेंबूर पोलिस ठाण्यातील हवालदार ड्युटीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या केलेल्या ठिकाणी सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये संपत गावढे यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असून कोणालाही जबाबदार धरु नका, असे म्हटले आहे. गावढे यांना घशाचा कर्करोग होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

अश्विनी भिडे यांच्याकडे कोविड १९ प्रतिबंध व्यवस्थापनाची जबाबदारी

चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'संपत गावढे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता बसंत पोलिस ठाण्यातील स्टोअर रुममध्ये आत्महत्या केली. स्टोअर रुममध्ये पडलेल्या ओढणीने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. ते ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.'

कोरोना: पी. चिदंबरम यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला १ कोटींची मदत