पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा अध्यक्ष पदासाठी पटोले विरुध्द कथोरे लढत

किसन कथोरे आणि नाना पटोले

राज्यामध्ये महाविकास आघाडीला बहुमत सिध्द करण्यात यश आले. त्यानंतर आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार नाना पटोल तर भाजपकडून आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पटोले विरुध्द कथोरे यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी गुप्त मतदान घ्यावे अशी मागणी भाजपने केली आहे. 

'२२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल'

काँग्रेसचे नेते नाना पटोले हे साकोली विधानासभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये आले आहेत. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी पटोले २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत भंडारा- गोंदिया मतदार संघात विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. काही मुद्द्यांवरुन पक्षासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ११ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन; दोन जवान शहीद

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपकडून किसन. एस. कथोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. किसन कथोरे हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते किसन कथोरे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद विनायक हिंदूराव यांचा १ लाख ३६ हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान,  अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले बाजी मारतात की भाजपचे आमदार किसन कथोरे बाजी मारतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहा