पक्ष सोडून जाणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निशाणा साधला. पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा लोक योग्य समाचार घेतील, असा टोला त्यांनी लगावला. नवी मुंबईत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मी मागील ५२ वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या सभागृहात आहे. यातील २७ वर्षे मी विरोधी पक्षात होतो. पण काम करताना मला कोणतीही अडचण आली नाही. आपण विरोधी पक्षात असतो तेव्हा अधिक काम करता येते, असे ते म्हणाले.
छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, आदेश द्यायचे असतात: मुख्यमंत्री फडणवीस
राज्यात १६ हजार शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली. त्यांच्यासोबत जाऊन बसणे योग्य नाही. रोजगार घालवण्याचे काम ज्यांनी केले. त्यांच्याबरोबर संघर्ष करायचा काळ आहे, असे ते म्हणाले.
आज जागरुक राहायची गरज आहे. कोणी पक्ष सोडून गेले तरी चिंता करु नका, असा सल्लाही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.