पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा टुकार प्रयत्न: आशिष शेलार

आशिष शेलार

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने शक्तीप्रदर्शन करत हॉटेल ग्रँड ह्यातवर १६२ आमदारांचे ओळख परेड घेतले. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. 'आघाडीच्या आमदारांचे ओळख परेड हा निव्वळ पोरखेळ आहे. ओळख परेडमुळे विधानसभेचं संख्याबळ सिद्ध होत नाही. गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा हा टुकार प्रयत्न असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

'आपली लढाई 'सत्ता'मेव जयतेसाठी नाही तर सत्यमेव जयतेसाठी'

दरम्यान, महाआघाडीने १६२ आमदारांचा कांगावा केला पण १४५ आमदार तरी उपस्थित होते का? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. ओळख परेड ही आरोपींची केली जाते. ओळख परेड घेऊन आमदार आणि त्यांना निवडून दिलेल्या लोकांचा अपमान केला असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसंच, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांचे आत्मबळ संपले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयईडीसह तिघांना अटक

दरम्यान, विधानसभेच्या पटलावर विश्वासदर्शक ठराव आम्हीच जिंकणार आहोत. पुढचे ५ वर्ष सरकार सुध्दा आम्हीच चावलणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच, आमदारांचा फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटोफिनिश आम्ही करणार असल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. 

सिंचन घोटाळ्यातील ९ फाईल्स क्लोज, पण..

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ashish shelar says identification parade is an insult to the mlas and the people who elected them