पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदी, शहांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील'

आशिश शेलार

गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका करणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. त्यातच संजय राऊत यांचा शुक्रवारी वाढदिवस असतानाच वयासोबत त्यांची परिपक्वताही वाढावी, असाही टोमणा आशिष शेलार यांनी लगावला.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री २५ वर्षे राहिल, पण मी पुन्हा येईन म्हणणार नाही'

आशिष शेलार म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा एकपात्री प्रयोग रोज सकाळी एका नेत्याकडून केला जातो आहे. पण या नेत्याचे हेतू सफल होणार नाहीत. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना समजून घ्यायला संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील. त्यांनी जरा विचार करून वक्तव्य करावीत, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

ऐतिहासिक तोट्यानंतर व्होडाफोन-आयडियाची सरकारकडे मदतीची याचना

सत्तेसाठी सध्या तीन पक्षांचा जो ड्रामा सुरू आहे. तो आम्ही बघतो आहोत. पूर्वी सगळे जण ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात होते. पण आता सत्तालालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलात गाठीभेटी होत आहेत. त्यांचे जे काही सुरू आहे ते आम्ही बघतोय, असेही सूचकपणे आशिष शेलार यांनी सांगितले.