पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राज ठाकरे चौकशीसाठी निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला'

अंजली दमानिया यांचा राज ठाकरेंना सवाल

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणातील चौकशीसाठी कुटुंबियांसोबत घराबाहेर पडण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीसीच्या पार्श्वभूमीव गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे यांनी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) च्या कार्यालयात हजेरी लावली. राज ठाकरे यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही होते.

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कुटुंबियांना सोबत घेत राज ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण सर्व मिळून माहिती देणार आहात का? राज ठाकरे यांचा हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.  

PHOTOS : ईडीच्या कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त

कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावून २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज ते ईडीसमोर हजर झाले. दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Anjali Damania questionable reaction on Maharashtra Navnirman Sena Chief Raj Thackeray face ed Enquiry enquiry with family