पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंधेरीच्या राजासाठी डिझायनर कपडे

अंधेरीचा राजा

गणपतीच्या आगमनाला अवघे पाचच दिवस उरले आहेत. सार्वजनिक मंडळाची गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मंडप सजवले जात आहेत. अंधेरीच्या राजासाठी तर चक्क डिझायनर कपडे तयार करण्यात आले आहेत. 

अमेरिकास्थित फॅशन डिझायनर सई सुमन  हिनं  अंधेरीच्या राजासाठी डिझायनर कपडे तयार केले आहेत. सोन्याचं जरीकाम केलेला किरमिजी रंगाचा शालू  आणि निळ्या रंगाची सॅटिनची धोती परिधान केलेली गणेशाची मुर्ती आगमन सोहळ्यात पाहायला मिळाली. 

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणार जीएसबी गणपती मंडळ

'मी लहानपणापासून या मंडळात येत आहे. यावर्षी मी गणेशोत्सवासाठी शहरात असल्यानं बाप्पांसाठी वस्त्रे तयार करण्याचं काम  हाती घेतलं असं सई म्हणाली. हा उत्सवाचा  काळ आहे म्हणूनच बाप्पांच्या वस्त्रांसाठी गडद रंगाची निवड करण्यात आली असंदेखील सईनं सांगितलं. 

मुंबईतल्या गणेशोत्सवासही मंदीची झळ, प्रायोजकांच्या संख्येत घट

गणेशोत्सवासाठी  अंधेरीच्या राजाला ३ किलो वजनाचे सोन्याचं मुकुटही तयार करण्यात आलं आहे. या मुकुटाची  किंमत १. २५ कोटी आहे. अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ हे ५४ वर्षे जुनं आहे. सुवर्णमहोत्सवानिमित्तानं भक्तांनी दान केलेल्या सोन्यापासून मुकुट तयार करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी सुवर्णमहोत्सवासाठी सईनं बाप्पांसाठी डिझायनर कपडे तयार केले होते. तेव्हापासून ती डिझायनर कपडे तयार करत आहे. सईनं एमी अवॉर्ड शोदरम्यान द बिग बँग थिअरीच्या अभिनेत्यासाठी कपडे डिझाइन केले होते. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Andhericha Raja Ganesh mandal got a US based designer to dress up the idol for all days of the festival