पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरारमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार

गोळीबार (प्रतिकात्मक छायाचित्र)

नालासोपारा (जि. पालघर) येथील सहायक पोलिस निरीक्षक सिद्धव्वा ऊर्फ सीमा जायभाये यांच्यावर शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबार झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्या बचावल्या. पालघर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद झाली. 

रक्तात गद्दारी असणारे फडणवीसांशी प्रामाणिक राहतील? : जितेंद्र आव्हाड

गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक म्हणून जायभाये काम पाहतात. शनिवारी रात्री त्या मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून घरी जात होत्या. विरारजवळील नॉव्हेल्टी हॉटेलजवळ थांबल्या. तिथूनच पुढे असलेल्या बर्गर किंगमध्ये काही घेण्यासाठी त्या गाडीतून उतरल्या. त्याच वेळी काळ्या रंगाच्या पल्सर या दुचाकीवरून आलेल्या तरुणाने जायभाये यांच्या दिशेने गोळी झाडली. चालकाने ते पाहिले. जायभाये यांना ढकलले. त्यामुळे गोळी वरून गेली.

कोरोनामुळे इटलीत एकाच दिवशी १३३ जणांचा मृत्यू, २ कोटी मास्कची ऑर्डर

दुसरी गोळी झाडणार इतक्यात चालक पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या दिशेने दगड फेकला. ते पाहून दुचाकीस्वार पळून गेला. हल्लेखोराने मास्क लावलेला होता. त्याच्या अंगात लाल व काळ्या रंगाचे जॅकेट होते, असे चालकाने सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:An unidentified assailant fired bullets at API Sidhava Jaybhaye of Vasai unit of Palghars local Crime Branch