पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे मुंबईतील ८५ वर्षीय डॉक्टरने गमावला जीव

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मुंबईतील ८५ वर्षीय सर्जन कम यूरोलॉजिस्ट डॉक्टरचा शुक्रवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या डॉक्टरचा मृत्यू हा कोरोना विषाणूमुळे झाल्याची पृष्टी झाली आहे. मृत डॉक्टरच्या कुटुंबियातील दोन व्यक्ती ब्रिटनहून परतल्या आहेत. या दोघांचेगी रिपोर्टस देखील पॉझिटिव्ह आहेत. 

'पुढचे १५ दिवस कसोटीचे, कृपा करुन शिस्त पाळा'

गुरुवारी सकाळी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणुच्या संशयामुळे त्यांचे नमुने खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. एएनआयच्या वृत्तानुसार, आरोग्यंत्रालयाने त्यांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची पुष्टी दिली आहे. 

यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षीय महिलेचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाचा हा पाचवा बळी होता. त्यानंतर मुंबईतील डॉक्टरचा जीव देखील कोरोना विषाणूनेच झाल्याचे स्प्ट झाले आहे. राज्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा हा थांबताना दिसत नाही. दिवसेंदिवस हा आकडा वाढतानाचे चित्र आहे. खबरदारीचे उपाय राबवत असताना सरकार लॉकडाऊमध्येही गर्दी पांघवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. 

आजचे राशिभविष्य | शनिवार | २८ मार्च २०२०

पुणे-मुंबई या शहरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूने आता पश्चिम महाराष्ट्रातही शिरकाव केलाय. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एका मोठ्या कुटुंबातील तब्बल २३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासह सांगली  जिल्ह्यातील आकडा हा २४ च्या घरात पोहचलाय. त्यामुळे ग्रामीण भागातही आता भितीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे.