पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमृता फडणवीस यांचा CM ठाकरेंवर टीकेचा आणखी एक बाण

उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. राज्याला वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे, जागो महाराष्ट्र!, अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ट्विटसोबत त्यांना एका इंग्रजी या वृत्तपत्रातील ट्विट रिट्विट करत त्यांनी ॲक्सिस बँकचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.  

सीमावाद! कोल्हापुरात शिवसैनिकांनी कन्नड चित्रपटाचे शो बंद पाडले

अमृता फडणवीस ज्या ॲक्सिस बँकमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्या बँकेत राज्यातील  पोलिसांची सर्व वेतन खाती राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडियात वर्ग करण्यात येणार असल्याची  शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन खाती ॲक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. यावरून माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अनेकदा आरोप देखील झाले होते. फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करतानाच, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी त्यावेळी केली होती.

रायगडच्या विकास कामात चूक खपवून घेणार नाही : संभाजीराजे

विरोधकांचे आरोप फेटाळून लावत २००५ मध्ये पोलिसांची वेतन खाती ही ॲक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय झाला होता, असे स्पष्टीकरण त्यावेळी फडणवीस यांनी दिले होते. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयातून परिपत्रक काढून पोलिसांचे पगार ॲक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. फडणवीस यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. पाच वर्षांत फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग करून ॲक्सिस बँकेला मदत केली का, असा प्रश्नही  त्यांनी उपस्थित केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: amruta fadnavis new tweet against cm uddhav thackeray On police departments salary accounts transfer Axis bank to SBI News