पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना; ठाणे पालिका अ‍ॅक्सिस बँकेतील खाती बंद करणार

उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस

शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन खाते अ‍ॅक्सिस बँकेतून एका राष्ट्रीयीकृत बँकेत हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी एका बैठकीत अधिकाऱ्यांचे खाते अ‍ॅक्सिस बँकेतून एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे हा घटनाक्रम शिवसेना आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यातील शाब्दिक युद्धानंतर घडला आहे. 

सर्वांनाच हिंदू म्हणणे अयोग्य, भागवतांच्या विधानाशी आठवले असहमत

दरम्यान, प्रशासनाची सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असणे नियमानुसार आहे. त्यामुळे सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी माध्यमांना सांगितले.

महाराष्ट्र पोलिसांचे सुमारे ११ हजार कोटी रुपयांचे वेतन अ‍ॅक्सिस बँकेच्या वतीने केले जाते. परंतु, ठाकरे सरकार पोलिसांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून करण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे अ‍ॅक्सिस बँकेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी ठाणे महापालिकेची बातमी समोर आली आहे. या वादाची सुरुवात अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर सुरु झाली. यामध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'माझे नाव राहुल सावरकर नाही' या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. 

आधी उधारी चुकवा, मगच तिकीट मिळेल; सरकारी संस्थांना Air Indiaचा दणका

गांधी यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हिंदुत्व विचारक वीर सावरकर यांच्या नखाच्या बरोबरीचेही नाहीत. त्यावर अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे टि्वट रिट्विट केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आपल्या नावामागे 'ठाकरे' लावून कोणी ठाकरे होऊ शकत नाही, अशा शब्दांत नाहक उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पलटवार करत ठाकरे आपल्या नावाला सार्थ ठरवत आहेत आणि अमृता फडणवीस या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत, असा टोला लगावला होता. त्यानंतर राज्यभरातून अमृता फडणवीस यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

जेवणात कांदा दिला नाही म्हणून तरुणांकडून हॉटेलची तोडफोड

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Amrita Fadnavis Vs Shiv Sena Thane Municipal Corporation Transfer Their Accounts From Axis Bank to nationalized bank