पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन तीन दिवसांपासून रुग्णालयात

अमिताभ बच्चन

महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर नानावटीच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. यकृताच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मंगळवारी पहाटेपासून ते  रुग्णालयात आहेत. यकृताच्या आजार बळावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु असून यासंदर्भात कुटुंबियांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  

पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही : PM मोदी

उल्लेखनिय आहे की,  बच्‍चन यांना १९८२ पासून यकृताची समस्या आहे. 'कुली' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्यांना इजा झाली होती. त्यावरील उपचारानंतर त्यांच्या यकृताचा ७५ टक्के भाग हा बंद असून केवळ २५ टक्केच काम करते. सध्या 'कोन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यंक्रमाच्या  माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याशिवाय नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.