पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

''बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा''

अमेय खोपकर

सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा, असं जाहीर आवाहन मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर केल्यानं चर्चेला नवं उढाण आलं आहे. आतापर्यंत  सर्वांना सोबत घेऊन चाललेल्या मनसेनं  आता  शिवसेनेच्या पाठोपाठ भगवा झेंडा हाती घेतला असल्याच्या चर्चा आहेत. 

राज्यात सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची, मार्चमध्ये कायदा करणार - देसाई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुरुवारी, २३ जानेवारीला मुंबईत राज्यव्यापी महाअधिवेशन होते आहे. या अधिवेशनाच्या तयारीचे मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर  लावण्यात आले आहे, या पोस्टरबाजीमध्ये भगव्या रंगाची झलक पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास अघाडीमुळे नाराज झालेल्या कडव्या शिवसैनिकांना मनसेत सहभागी होण्याचं जाहीर आवाहन खोपकर यांनी केलं आहे. 'पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका... निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा' असं जाहीर आव्हान खोपकर यांनी ट्विटद्वारे केलं आहे. 

CAA संपूर्ण देशात लागू करूनच दाखवा, प्रशांत किशोर यांचे प्रत्युत्तर

राज्यात हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना पक्षानं २०१९ च्या निवडणुकानंतर आपल्या भूमिकेस काहीशी मुरड घातली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या 'सेक्युलर' पक्षाशी युती केल्यानंतर हिंदुत्त्ववादाचा मुद्दा शिवसेनेनं काही हात दूर ठेवल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे नाराज झालेल्या काही कडव्या शिवसैनिकांना आता मनसेनं साद घातली आहे आता या  सादेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

सौदी राजपुत्रानं अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझॉसचा फोन हॅक केल्याचा आरोप