पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Mumbai Marathon 2020: आशियातील सर्वांत मोठ्या मॅरेथॉनला सुरुवात

यंदा मुंबई मॅरेथॉनचे हे १७वे पर्व आहे. photo by Satyabrata Tripathy/ht

आशियातील सर्वांत मोठ्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दरवर्षी तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा होत असते. यंदा मुंबई मॅरेथॉनचे हे १७वे पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स्पर्धेला सुरुवात झाली. तर वरळी येथून हाफ मॅरेथॉनची सुरूवात झाली. एकूण ४ लाख २० हजार अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कम असून या स्पर्धेत मुख्य स्पर्धेतील तीन परदेशी धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर, २५ हजार डॉलर आणि १७ हजार डॉलर रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर भारतीय स्पर्धकांना ५ लाख, ४ लाख, ३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहेत. देश-विदेशातील नामांकित धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर हौशी स्पर्धकांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. 

मुंबई मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटू सहभागी झाले आहेत. ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९,६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५,२६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९,७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८,०३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १,०२२ आणि अपंगांच्या शर्यतीत १,५९६ धावपटू सहभागी झाले आहेत.

एकूण सात स्पर्धा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
पूर्ण मॅरेथॉन- पहाटे ५.१५, १० किलोमीटर-स. ६.२०, एलिट स्पर्धा -स. ७.२०, अपंगांसाठी स्पर्धा – स. ७.२५, ज्येष्ठ नागरिक – स. ७.४५, ड्रीम रन – स. ८.०५

वरळी डेअरी- 
अर्ध मॅरेथॉन-पहाटे ५.१५