पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेस अटक

करण ओबेरॉय

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेस ओशिवरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. संबंधित महिलेने स्वत:वर हल्ला झाल्याची खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी महिलेच्या वलिकालाही अटक करण्यात आली होती. 

बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेवर २५ मे रोजी अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला केला होता. यासंबधी लेखी तक्रारही  महिलेनं ओशिवरा पोलिस स्थानकात नोंदवली होती. मात्र पीडित महिलेच्या वकिलानं आपल्या काही नातेवाईकांना  आणि ओळखीच्या व्यक्तींना हाताशी धरून हल्ल्याचा बनाव रचला होता हे पोलिसांच्या चौकशीत उघड झालं होतं. महिलेच्या वकिलानं खोट्या हल्ल्यासाठी हल्लेखोरांना १० हजार रूपये दिले असल्याचंही चौकशीत समोर आलं. त्यानंतर वकिलाला अटक करण्यात आलं. 

तर दुसरीकडे या कटात महिला देखील सहभागी होती तिनं हल्ला झाल्याची खोटी तक्रार केली असंही पोलिसांच्या चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.  या प्रकरणातील आरोपी करण ओबेरॉयला मुंबई उच्च न्यायालयानं  जामीन मंजूर केला. आरोपीने २० जूनला ओशिवरा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी. तसेच तक्रारदार महिलेशी किंवा या प्रकरणाशी संबंधित लोकांशी संपर्क करू नये आणि खटल्याच्या सुनावणीत सहकार्य करावे अशा अटींवर ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला गेल्याच आठवड्यात  जामीन मंजूर करण्यात आला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Alleged rape case against actor Karan Oberoi The woman arrested by police charges of a staged attack