पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत मद्याच्या विक्रीत घट, महसूल विभागाला टेन्शन!

मद्य विक्रीस हायकोर्टाची परवानगी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई शाखेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवरून मुंबईत मद्याच्या विक्रीमध्ये गतवर्षात घट झाल्याचे समोर आले आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये बिअर आणि वाईन या दोन्हींच्या विक्रीमध्ये मुंबईत अनुक्रमे ५.१८ टक्के आणि ५.३१ टक्के इतकी घट झाली. मद्याच्या विक्रीमध्ये घट झाल्याने महसूल विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मुंबईमध्ये मद्याच्या विक्रीतून महसूल विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नात पाच टक्क्यांची घट झाली आहे. 

अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणचा हल्ला, १२ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुंबईकरांनी एकूण १.४१ कोटी लिटर बिअर रिचवली. हा आकडा २०१८ मधील याच कालावधीतील आकडेवारीच्या ७.७० लाख लिटरने कमी आहे. दुसरीकडे भारतीय बनावटीची परदेशी लिकर उदाहरणार्थ व्हिस्की याच्या विक्रीमध्ये किरकोळ घट गतवर्षात झाली आहे. ही घट १.०२ टक्के इतकी आहे. देशी बनावटीच्या मद्याच्या विक्रीतही किरकोळ स्वरुपाची घट झाली आहे. जी ०.५३ टक्के इतकी आहे. 

राज्य उत्पादन शुक्ल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुटीनिमित्त बाहेरगावी जाऊन आनंद साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेही मुंबईतील मद्यविक्रीत घट झाली असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बिअरच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होते आहे त्यामुळेही याचा नकारात्मक परिणाम झालेला असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

कामगार देशोधडीला, मोदी सरकार स्वतःच्याच धुंदीत मग्नः शिवसेना

पश्चिम भारतातील हॉटेल आणि रेस्तराँ संघटनेचे अध्यक्ष गुरुबक्ष कोहली म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये मद्याच्या विक्रीमध्ये घटच झाली आहे. उत्पादन शुल्कात झालेली वाढ आणि वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी यामुळे हा बदल दिसतो आहे.