पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय - शरद पवार

शरद पवार

भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याचा अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा याला पाठिंबा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी स्पष्ट केले. एक ट्विट करून शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.

राज्यात भाजप-राष्ट्रवादी बंडखोर गटाचं नवं सरकार

शनिवारी सकाळी राजधानी मुंबईमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. पहाटे सहा वाजता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली. त्यानंतर आठ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. वास्तविक शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार होता. त्याआधीच सकाळी भाजप आणि राष्ट्रवादी बंडखोर गट असे नवे सरकार सत्तेवर आले.

अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला: संजय राऊत

आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे की, भाजपला पाठिंबा देण्याचा अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे. पक्ष म्हणून आमचा या निर्णयाला पाठिंबा नाही. या ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ajit Pawars decision to support the BJP to form the Maharashtra Government is his personal says sharad pawar