पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी बंड केलं नाही, तर भूमिका मांडली: अजित पवार

अजित पवार

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आज फक्त मुख्यमंत्री आणि ६ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. तसंच, मी नाराज नव्हतो. मी बंड केले नाही तर भूमिक मांडली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसास्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेण्यावर निर्णय घेण्यात आला. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होणार - सूत्र

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे दोन असा एकूण ६ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावानंतर तसंच अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पुढच्या गोष्टी ठरवण्यात येतील. या शपथविधीनंतर तिन्ही पक्षाचे प्रमुखांची बैठक होईल. मंत्रिमंडळात कोणा-कोणाकडे कोणते स्थान  असेल यावर निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात मोदी-शहांचा डाव अपयशी ठरला: सोनिया गांधी

तसंच आज आपण मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसंच, आमदार म्हणून मी शपथविधी सोहळ्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यासोबत जाणार अल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मी आधीही राष्ट्रवादीत होतो, आताही आहे आणि राहणार आहे. तसंच शरद पवार आमचे साहेब असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, योग्य वेळ आल्यानंतर मी बोलेल. मात्र उपमुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर अजित पवार यांनी मौन बाळगले. 

'विरोधी पक्ष दिसत नसल्याचं म्हणणाऱ्यांवर आज विरोधात बसायची..