राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ थांबली पाहिजे. त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसंच, सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारी येणारी हनुमान जयंती आणि त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजा आणि धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.
कोविड-१९ : PM मोदींच्या संदेशावर भारतीय लष्कराकडून प्रतिक्रिया
अजित पवारांनी सांगितले की, राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास पोहचली आहे. ज्या परिसरात रुग्ण आढळत आहेत ते परिसर सील करण्यात आले आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून कोरोनाविरोधातील लढ्यात योगदान देत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे या लढ्याला धक्का बसत असल्याची खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली.
ताप, खोकला असल्यास सामान्य रुग्णालयात जाऊ नका - मुख्यमंत्री
दरम्यान, कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता, विज्ञानवादाच्या दृष्टिकोनातूनच जिंकता येईल. यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्राने परतवून लावली. आताही आपण सर्वजण, एकजुटीने, शहाणपणाने, घरातच थांबून, कोरोनाचे संकट परतवून लावूया, असे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये. नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर येणाऱ्या काळात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी अजित पवार यांनी दिला.
कोविड-१९ : देशातील पहिल्या कोरोनाग्रस्त डॉक्टरची यशस्वी प्रसूती